Ad will apear here
Next
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला

पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व ‘मनविसे’चे कोथरूड विभाग अध्यक्ष शशांक अमराळे यांनी दिली. मनसेचे सरचिटणीस अॅड. किशोर शिंदे हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. 

‘स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी झालेल्या एकांकिकांपैकी सर्वोत्तम एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील. स्पर्धेची अंतिम फेरी सहा डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार असून, विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा स्पर्धेचा उद्देश आहे,’ असेही अमराळे यांनी नमूद केले.

अधिक माहितीसाठी : ७०२०५ ५१२३५, ७२७६६ ९६७०५   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUNCG
Similar Posts
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे विजेतेपद पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले.
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language